Friday, October 9, 2015

# शाळेचे नाव - महाराणी लक्ष्मीबाई मराठी प्रा. शाळा, क्र.१, सुभाष मैदान, पारडी म.न.पा. नागपूर.

# शाळेबद्दल थोडक्यात - शाळा १ ते ८ वी पर्यंत दुपार विभागामध्ये १२.३० ते ५.३० शाळेला म.न.पा ची स्वतंत्र इमारत नाही. समाजभवनाच्या इमारती मध्ये शाळेची विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे. गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी यंत्रणा. येणारा विद्यार्थी हा आर्थिक दुर्बल घटकातून येतो. महिला बचत गटामार्फत शालेय पोषण आहार योजना राबवली जाते.

# शाळेचे ब्रीदवाक्य - आमची शाळा, गरिबांची शाळा, गुणवंतांची शाळा

# शाळेत राबवले जाणारे उपक्रम -

१. शैक्षणिक सहल
२. अक्षर सुधार
३. सामान्य ज्ञानावर परिपाठ
४. वृक्षारोपण
५. शैक्षणिक प्रयोग
६. बाल विज्ञान मेळावा
७. वार्षिक स्नेहसंमेलन
८. राखी कार्यशाळा
९. ग्रीटिंग कार्यशाळा
१०. वक्तृत्व स्पर्धा
११. निबंध स्पर्धा
१२. कथाकथन स्पर्धा
१३. राजू मीना मंच
१४. वृक्षदिंडी
१५. समूह गीत-गायन स्पर्धा
१६. स्वच्छता अभियान

# शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासनाच्या नियमाप्रमाणे, सत्र सुरु होण्याच्या अगोदर

# खेळाचे मैदान - खेळाचे मैदान आहे,

# शिक्षक वृंद -

शोभा  राऊत  मु. अ.
शुभांगी पोहरे
कल्पना कळंबे
वंदना माटे
नंदिनी पुट्टेवार
लता बाभुळकर
रेखा पांडे
वृंदा पाठराबे
विद्या राऊत
रेखा गिरी

===========================
# आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,
# मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर शैक्षणिक ओझेच होय - यशपाल समिती, भारत सरकार
# 'मराठी शाळांची माहिती' या अभिनव उपक्रमातर्फे आत्तापर्यंतची, शाळा क्रमांक – ५७
# ब्लॉगरची लिंक – http://goo.gl/mnG8c6
===========================

फोटो -